Tuch Sukhkarta Tuch Dukhaharta
Bappa Moraya Re With Lyrics | बाप्पा मोरया रे | Prahlad Shinde | Ganpati Songs | गणपतीची गाणी
Ganesh bhajan in Marathi.
Tuch Sukhkarta Tuch Dukhaharta
तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे ...॥
चरणी ठेवितो माथा॥
पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥
बाप्पा मोरया रे ...॥
चरणी ठेवितो माथा
नाव काढू नको तान्दुळाचे , केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी,द्यावा आशिर्वाद आता ॥
बाप्पा मोरया रे ...॥
चरणी ठेवितो माथा
आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणि केळ,सार्या प्रसादाची केली भेळ
गुण गाइन आणि राहीन, द्यावा आशिर्वाद बाप्पा॥