Jhale Bhajan (Nirop Aarti) - Aamhi Namito Tav Charan
जाहले भजन- मराठी विठ्ठल गीत -अनुराधा पौडवाल | JAHALE BHAJAN | AMRUTAHUNI GOD VITTHALACHI ODH
Ganesh aarti in Marathi.
Jhale Bhajan (Nirop Aarti) - Aamhi Namito Tav Charan
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनियां देवा गुण तुझेची गातो ॥ १ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥ ३ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
जेंव्हा सर्व आम्ही मिळूं ऐसा या ठाया ऐसा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥ ४ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
वारुनिया संकटे आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची साऊली देवा दीनावरि करी ॥ ६ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥ ८ ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥