अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं
Achyutam Keshavan Krishna Damodaram
आरती संग्रह
👁 5Loading…
Yamunechya Tiri Kal Pahila Hari (Kanha Vajavi Basari)
Krishna bhajan in Marathi.
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती - आरती संग्रह
Yamunechya Tiri Kal Pahila Hari (Kanha Vajavi Basari)
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी || धृ ||
बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मधूरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ॥१॥
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी ॥२॥
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सुंगार
झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ॥३॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Krishna Bhajans →