आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
Aarti Dnyanraja (Mahakaivalyateja)
आरती संग्रह
👁 15Loading…
Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye
Vitthal aarti in Marathi.
Also known as: येई हो विठ्ठले, Yei Ho Vitthale, Vitthal Alavni, Nidhalavari Kar Thevuni
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०७)
Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ओ देवा, वाट मी पाहें ।। १ ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। || धृ ||
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।। २ ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। || धृ ||
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि...
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।। ३ ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। || धृ ||
विठोबाचें राज्य आम्हा दसरा दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।। ४ ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। || धृ ||
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें...
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।। ५ ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। || धृ ||
Read with purity of heart and devotion 🙏
More Vitthal Aartis →